Tuesday, 22 February 2011

पाहिले वळून मला

कळे काय कळे एवढे कळून मला
जगून मीच असा घेतसे छळून मला
तुरुंग हाच मला सांग तू कुठे नाही?मिळेल काय असे दूरही पळून मला
पुसू कुणास कुठे राख राहिली माझी?उगीच लोक खुळे पाहती जळून मला
खरेच सांग मला.. काय ही तुझीच फुले?तुझा सुगंध कसा ये आढळून मला?
जरी अजून तुझे कर्ज राहिले नाही
अजून घेत रहा जीवला पिळून मला
उजाडलेच कसे? ही उन्हे कशी आली?करी अजून खुणा चंद्र मावळून मला
कधीच हाक तुझी हाय ऐकली नाही
अखेर मीच पुन्हा पाहिले वळून मला
                                          सुरेश भट  

No comments:

Post a Comment

click for free hit counter
get a free hit counter