Tuesday 22 February 2011

अखेर कमाई


मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.शिवाजीराजे म्हणाले ,मी फ़क्त मराठ्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,मी फ़क्त बौद्धांचा.टिळक उद्गारले ,मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,तरी तुम्ही भाग्यवान.एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
- कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment

click for free hit counter
get a free hit counter