Tuesday 22 February 2011

वणवण

  
वणवण
रुणझुणत राहिलो! किणकिणत राहिलो!जन्मभर मी तुला 'ये' म्हणत राहिलो!
सांत्वनांना तरी हृदय होते कुठे?रोज माझेच मी मन चिणत राहिलो!
ऐकणारे तिथे दगड होते जरी,मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो!
शेवटी राहिले घर सुनेच्या सुने...उंबऱ्यावरच मी तणतणत राहिलो!
ऐनवेळी उभे गाव झाले मुके;मीच रस्त्यावरी खणखणत राहिलो!
विझत होते जरी दीप भवतालचे,आतल्या आत मी मिणमिणत राहिलो!
दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा रणरणत राहिलो!
मज ताराच तो गवसला नेमका..अंबरापार मी वणवणत राहिलो!
    
                   सुरेश भट

No comments:

Post a Comment

click for free hit counter
get a free hit counter