Tuesday 22 February 2011

निळा पारवा

वसुंधरेच्या माथ्यावरती
घुमतो आहे
आभाळाचा निळा पारवा.
डोळ्यावरती राखी ढापण,लक्ष सदाचें धनिणीपाशी
अन धनिणीच्या पायामधल्या
रुणझुणणाऱ्या नादापाशी.
-अवचित काही घडलें
आणि दचकला निळा पारवा;टपोरल्या डोळ्याच्या गुंजा.
जाती त्याच्या अगदी जवळून
किलबिलणारे कुणी मुशाफिर
रंगित पक्षीकुणी घासली चोच तयावर;कुणी घातली शिळ तयाला;ऐकवैलीपंखाची फडफड;दाखविले चित्रांकित वैभव
पंखावरचे.गिरकी घालुन त्याच्या भवती
निघुन गेले.. धुंद मुशाफिर;झुलवित अपुले पंखे,झुलवित त्याला.
पुन्हा दचकला निळा पारवामनात भरले वारे–\पिसा पिसातुन थरथरणारे;फुगली पंखे;उचलुन धरला पोटापाशी
पाउ एकुटा;मान ताठली जरा खालती
झेंप भाराया
तोच वरी ये वसुंधरेचा
तांबुस गोरा कोमलसा कर.भरवई त्याच्या टोची मध्ये
एकच मोती
शुभ्र टपोरा,एकच माणिक , झगमगणारे.
पुन्हा टेकले पाउल खाली;नितळाई ये पुन्हा पिसांवर
-
आणि लागला पुन्हा घुमाया
आभाळाचा……. निळा पारवा.
- इंदिरा संत

किती दिवस मी

किती दिवस मी मानित होतें
ह्या दगडापरी व्हावे जीवन;पडो उन वा पाउस त्यावर
थिजलेलें अवधें संवेदन
किळवुन ज्याच्या वरती डोळे
मनात यावे असले कांही
तोच एकदा हसुन म्हणाला-दगडालाही चुकले नाही.
चुकले नाहीचढते त्यावर
शेवाळाचे जलमी गोंदण;चुकले नाही .. केविलवाणें
दगडफुलाचे त्यास प्रसाधन
थिजलेल्याचे असले कांही
त्याहुन वाते, हवे तुझे मन
सळसळणारे अन जळणारे
पशापशाने जाया भडकुन
इंदिरा संत

चर्‍हाट

भाषेच्या चर्हाटाला
कधीही अंत नसतो !सारखी बडबड करणारा
चुकूनही संत नसतो !
- ‘
बोलगाणी’ – मंगेश पाडगांवकर

एकामेकांशिवाय


आपण असतो उभे एकमेकांजवळ एकमेकांशिवाय.तरीही ओळखतो भुकेचा वास.इच्छांचे वळसे.हिशोब करीत करीत जपुनच घसरतो.गरजांच्या मिठयांनी गरजाच प्रसवतो .आणि यातले नसते काहिच आपल्या स्वाधीन .एकमेकांजवळ. एकमेकांना . एकमेकाने.एकमेकांहून.एकमेकांआत : एकमेकांशिवाय .
असेच बसतात प्रत्यय स्वार होऊन सगळे उपाशी भाषेवर :आणि असा चालतो आशयाचा प्रवास.एकदाच अवलिया भाषेच्या देशातुन परागंदा होतो :अज्ञात काळोखांतला अचानक पाऊस शब्दहीन एकांतात फांदि होऊन पितो:त्याला आपण पुरतो : दैनिक पेपरांच्या डोंगर रद्दीखाली .पों पों पीं पीं ट्रिंग ट्रिंग खट खट हैलो हैलो एकमेकांजवळ .एकमेकाना.एकमेकाहून.एकमेकांआत : एकमेकांशिवाय .
- मंगेश पाडगांवकर

जन्म


मी घेतले, तरि मिळाले
कधीच मी जे घेऊ नये.तुही दिल्याविण दिलेस सारे
कधी कुणी जे देऊ नये .
पिचलेल्या जन्मातुन रुजले
विजभारले सुर नवे.ऐकण्यात जे व्यथेत मिटले
लोचन राधेचेच हवे.
श्याम घनांची उतट अनावर
कासाविस बरसात अशी.काळोखाच्या यमुनेकाठी
धडधडणारी हवी पिशी.
मलाच नकळत माझे डोळे
यमुनेतुन वाहत जाती .अंधपणातच चाचपतो मी
फुटल्या जन्माची माती.
दान तुझे हे घेण्यासाठी
फुटल्यावाचुन हात कुठे ???या भरलेल्या रित्या ओंजळीत
हिरवा हिरवा जन्म फुटे.
- मंगेश पाडगांवकर
click for free hit counter
get a free hit counter