मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!
मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्नांत चूर;तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल!
विसरशील सर्व सर्व
अपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल!
सहज कधी तू घरात लावशील सांजवात;माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल!
जेव्हा तू नाहशील,दर्पणात पाहशील,माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!
जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत,माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल!
मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुद;माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल
सुरेश भट

No comments:
Post a Comment